

Karjat Sets an Example of Humanity as Volunteers Stand by Their Sick Companion
sakal
कर्जत : किडनी विकाराने त्रस्त सहकार्याला गरिबीचे चटके सोसत आर्थिक विवंचनेत असताना सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांनी घरी जात मायेची फुंकर तर घातलीच; मात्र काही रक्कम देत औषधोपचारासाठी मदतीचा हातही दिला. या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ही मदत स्वीकारताना तो आणि कुटुंबीय गहिवरले. सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांचेही डोळे पाणावले.