
अहिल्यानगर: घरगुती कारणावरुन पतीचा मानसिक छळ केल्याने त्याने या त्रासाला कंटाळून घरातच गळफास घेत आत्महत्या केली. आकाश विठ्ठल जगदाळे (वय २५, रा. रुईछत्तीसी, ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी स्नेहल आकाश जगदाळे हिच्याविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.