नवऱ्याला गोळ्या घालून मारले, पत्नीला सात वर्षांनंतर अटक

सचिन सातपुते
Thursday, 24 December 2020

शांताबाई सातपुते असे तिचे नाव आहे. न्यायालयाने तिला चार दिवसांची (ता.28) पोलिस कोठडी सुनावली. शहरातील शास्रीनगर येथे 8 सप्टेंबर 2013 रोजी रात्री सव्वाएकच्या सुमारास पिस्तुलातून झाडलेल्या दोन गोळ्या लागून रामजी सातपुते गंभीर जखमी झाले. नंतर त्यांचा मृत्यू झाला.

शेवगाव : कोणताही गुन्हा जास्त काळ लपून राहू शकत नाही. कानून के हाथ लंबे होते है, असा हिंदी सिनेमात डायलॉग आहे तो काही खोटा नाही. शेवगावात तसंच घडलंय. शहरातील शास्रीनगर भागात सात वर्षांपूर्वी पिस्तुलातून झाडलेल्या दोन गोळ्या लागून रामचंद्र ऊर्फ रामजी साहेबराव सातपुते यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सबळ पुरावे आढळून आल्यावर त्यांच्या पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला काल (बुधवारी) अटक करण्यात आली.

शांताबाई सातपुते असे तिचे नाव आहे. न्यायालयाने तिला चार दिवसांची (ता.28) पोलिस कोठडी सुनावली. शहरातील शास्रीनगर येथे 8 सप्टेंबर 2013 रोजी रात्री सव्वाएकच्या सुमारास पिस्तुलातून झाडलेल्या दोन गोळ्या लागून रामजी सातपुते गंभीर जखमी झाले. नंतर त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - पोपटराव पवारांची शेती पहा कसे कमावतात लाखो

या बाबत शेवगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यावर मृताची पत्नी शांताबाई सातपुते हिच्याविरुद्ध 30 डिसेंबर 2017 रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला.

पोलिस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे वर्ग केला होता. तपासात औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील न्यायवैद्यक अहवाल, मुंबईतील बॅलेस्टिक तंत्रज्ञ, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अभिप्राय मागविला. त्यात आरोपी शांताबाई हिच्याविरुद्ध सबळ पुरावे आढळून आल्यावर बुधवारी (ता. 23) तिला अटक केली. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी तिला 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband shot, wife arrested seven years later