husband wife dispute those who go to solve beaten up ahmednagar
husband wife dispute those who go to solve beaten up ahmednagarSakal

Ahmednagar News : भांडण मिटवायला गेले अन्‌ मार खाऊन आले

पती-पत्नीचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी पिंपळगाव माळवी येथे घडली.

अहमदनगर : पती-पत्नीचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी पिंपळगाव माळवी येथे घडली. याप्रकरणी पूजा प्रशांत पवार (वय २७, रा. पिंपळगाव माळवी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पतीसह सात जणांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नामदेव लक्ष्मण चांदणे, नीलेश नामदेव चांदणे, राजू बबन पवार, किशोर बबन पवार, प्रशांत बबन पवार, आशाबाई बबन पवार, आश्विनी राजू पवार (सर्व रा. पिंपळगाव माळवी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पूजा व त्यांचे पती प्रशांत यांच्यात वाद असून, गेल्या एक महिन्यापासून पूजा त्यांच्या माहेरी रहात आहे. मंगळवारी त्यांना वाद मिटविण्यासाठी फोन आल्याने त्या त्यांच्या भावांना घेऊन पिंपळगाव माळवी येथे गेल्या होत्या. तेथे त्यांच्यात वाद झाले. नीलेश व इतरांनी पूजा, त्यांचे भाऊ सुनील व दीपक यांना मारहाण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com