बाप-लेकीवर तरसाचा हल्ला, दोघे गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

निमगाव गांगर्डा शिवारात दुचाकीवरून जाणारा शेतकरी व त्याच्या मुलीवर तरसाने हल्ला केला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. नगर येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना हलविले आहे.

बाप-लेकी तरसाचा हल्ला 

कर्जत : निमगाव गांगर्डा शिवारात दुचाकीवरून जाणारा शेतकरी व त्याच्या मुलीवर तरसाने हल्ला केला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. नगर येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना हलविले आहे. आबासाहेब हनुमंत कर्डिले (वय 35) व मुलगी स्नेहल (वय 12), अशी जखमींची नावे आहेत. 

हेही वाचा रेकॉड ब्रेक : नगर जिल्ह्यात दिवसभरात 43 कोरोना रुग्ण 

आबासाहेब कर्डिले मुलीसह नेहमीप्रमाणे दुचाकीवर शेतात जात होते. झुडपात दबा धरून बसलेल्या तरसाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने बाप-लेक खाली पडले. खाली पडलेल्या मुलीवर तरसाने हल्ला चढविला. हे पाहून आबासाहेब यांनी दोन्ही हातांनी तरसाला पकडून जमिनीवर आपटले व दाबून धरले. त्यामुळे चवताळलेल्या तरसाने कर्डिले यांनाही चावा घेतला. त्यात ते गंभीर जखमी झाले. 

आवश्‍य वाचा फेरफार नडली : मंडलाधिकारी आव्हाड व तलाठी कैदके निलंबित 

याबाबत माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अरणगावचे अधिकारी किशोर गांगर्डे यांना माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी आले. जखमींना तातडीने नगरला हलविण्यात आले. अहमदनगर  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hyena's attack both seriously injured

टॅग्स
टॉपिकस