esakal | संभाजी महाराजांच्या नावाची बिडी बंद करा; अन्यथा ४ सप्टेंबरपासून आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

If the bidi in the name of Sambhaji Maharaj is not closed agitation from 4th September

महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विक्री केली जात आहे. हा संभाजी महाराजांचा अपमान आहे.

संभाजी महाराजांच्या नावाची बिडी बंद करा; अन्यथा ४ सप्टेंबरपासून आंदोलन

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विक्री केली जात आहे. हा संभाजी महाराजांचा अपमान आहे. संभाजी बिडीचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कंपनीने नाव बदलले नाही तर ४ सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने निवेदनाद्‌वारे देण्यात आला आहे.

बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. या ना त्या मुद्यांवरून शिवरायांचा अवमान झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे शिवभक्तांनी वेळोवेळी तीव्र संताप व्यक्त केला. पण आता, संभाजी बिडीबद्दल शिवभक्तांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी यांच्या नावाने महाराष्ट्रात 80 वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने धूम्रपान उत्पादन केले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची युद्धनीती, लेखन, संपूर्ण जगाला माहिती आहे. असं असताना जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने बिडी उत्पादन होतं आहे.

या बिडीच्या बंडलवर महाराजांच्या नावाने याची विक्री होते. तो कागद फाडून फेकला जातो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होतं आहे, हा अवमान सहन केला जाणार नाही. यासाठी या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने नाव बदलून निर्मिती करावे, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक अण्णा काटे यांनी केली आहे.

loading image
go to top