
आता अरणगाव शिवारात छापा घालून जुगार खेळणाऱ्या 25 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 84 हजार 610 रुपये व तीन लाख 70 हजारांच्या दुचाकी जप्त केल्या.
नगर : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या पथकाने काल सायंकाळी तालुक्यातील अरणगाव शिवारात जुगारअड्ड्यावर छापा घालून 25 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने यापूर्वी शेवगाव, संगमनेर तालुक्यांतही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी पथकाने जेऊर (ता. नगर) येथील जुगारअड्ड्यावर छापा घातला होता.
हेही वाचा - नेवासे पोलिसांची गुजरातेवर स्वारी
आता अरणगाव शिवारात छापा घालून जुगार खेळणाऱ्या 25 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 84 हजार 610 रुपये व तीन लाख 70 हजारांच्या दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये ठेकेदार, व्यापारी, शेतकऱ्यांचा समावेश आहे.
योगेश सुपेकर, सागर कोल्हे, जगन्नाथ शिंदे, अल्लाउद्दीन सय्यद, महेंद्र भांबळ, विशाल चांदणे, विजय शिंदे, गोविंद शिंदे, दत्तात्रेय गिरमे, हकील पठाण, भाऊसाहेब तोरडमल, सुनील शितोळे, राहुल गिरे, अनिल बोठे, अनिल दरेकर, दशरथ कांबळे, भाऊसाहेब गायकवाड, गणेश चोबे, भरत चोबे, विकास वराडे, लतीफ शेख, कैलास लष्करे, किरण मुके, संतोष साबळे, विशाल थोरात, अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.