
Four Held in Shrirampur for Illegal Arms Trafficking; Police Seize Weapons Cache
Sakal
श्रीरामपूर: पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अपर पोलिस अधीक्षक कार्यालय व शहर पोलिसांच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात दोघांकडून तीन गावठी पिस्तूल, १० काडतुसे, सहा मॅगझीनसह इर्टिगा कार जप्त केली. आज (ता.२४) सकाळी संजयनगर रोड, मिल्लतनगर येथे ही कारवाई करण्यात आली. कारवाईने आरोपींचा सौदा फसल्याने बेलापूर येथील दोघा खरेदीदारांनाही चतुर्भूज व्हावे लागले.