माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत व मिरजगाव राज्यात दुसरे

माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत व मिरजगाव राज्यात दुसरे

कर्जत : जलयुक्त शिवार अभियानानंतर कर्जत नगरपंचायतचा राज्यात डंका वाजला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धेत नगरपंचायत गटात कर्जत नगरपंचायतीने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायत गटात मिरजगाव ग्रामपंचायतीने राज्यात दुसरा क्रमांक मिळवित आहे. ग्रामपंचायत गटात तालुक्याचा दबदबा कायम ठेवला आहे.

दुपारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे आदींच्या उपस्थितीत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला. (In my Vasundhara competition Karjat and Mirajgaon are second in the state)

माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत व मिरजगाव राज्यात दुसरे
शेजाऱ्याने शेतरस्ता अडवला असेल तर साधा अर्ज करील काम तमाम

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सन २०२०-२१ मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत नगरपंचायत गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरामध्ये कर्जत नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीमध्ये तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला होता.

माझी वसुंधरा अभियानातंर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करणाऱ्या उपाययोजनांची दखल घेत पर्यावरण व पर्यावरणातील बदल व माझी वसुंधरा टीम ने मूल्यांकन करून ही निवड केली आहे. कर्जत नगरपंचायतीला जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यात तिसरा क्रमांक पूर्वी मिळाला आहे. माझी वसुंधरा अभियानात तत्कालीन नगराध्यक्ष नामदेव राऊत व नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे यांनी अतिशय नियोजनबद्ध अभियानातील कार्यवाहीच्या बाबीवर उपाययोजना केली होती, त्यात ज्या मुद्द्यावर मूल्यांकन होणार होते त्यात पृथ्वीमध्ये नव्याने केलेल्या हरित क्षेत्राच्या विकासात समर्थ उद्यान व शहा उद्यान यासह वृक्षारोपण अभियान, वालवड आणि बर्गेवाडी रस्ता फुटपाथवर भारतीय प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली होती.

घनकचरा व्यवस्थापनामध्ये घंटागाडीने ओला व सुखा, प्लास्टिक कचरा वर्गीकरण करून संकलन व डंपिंग, वायूमध्ये धूळ कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूचे हरितकरण, जलसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले तसेच शहरालगत असलेले नदी,बंधारे यांची स्वच्छता व पुनर्जीवन आणि सौंदर्यीकरण, सांडपाणी, मैला व्यवस्थापन करण्यासाठी घरपोहोच व्यवस्था करण्यात आली होती.

पर्यावरण सुधारणा व संरक्षण जनजागृतीसाठी हरित कायदा पालन करण्याची सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच जेथे उपस्थिती तेथे उपक्रम राबविण्यात आला. या कामी मुख्याधिकारी गोविंद जाधव, तत्कालीन मुखताधिकारी साजिद पिंजारी व धनंजय कोळेकर,प्रशासक अर्चना नष्टे तसेच माजी मंत्री राम शिंदे ,आमदार रोहित पवार, खासदार डॉ. सुजय विखे पाटील,सर्व सामाजिक संघटना व आम्ही कर्जतचे सेवेकरी आदींचे सहकार्य लाभले.

रोहित पवारांचे ट्विट

आमदार रोहित पवार यांनी स्पर्धेतील निकालबद्दल ट्विट केलं आहे. मिरजगाव आणि कर्जतचा दुसरा क्रमांक आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केलं आहे.((In my Vasundhara competition Karjat and Mirajgaon are second in the state)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com