Ahmednagar News : पुणे महामार्गावरील पथदिव्यांचे लोकार्पण; जनता पाठीशी, घाबरत नाही - बाळासाहेब थोरात

राजकारण न करता महामार्ग व विद्युतीकरण पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव हॅपी हायवेच्या माध्यमातून सर्वांनी साजरा करावा, यासाठी खुले निमंत्रण
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsakal

संगमनेर : कोणतेही राजकारण न करता महामार्ग व विद्युतीकरण पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव हॅपी हायवेच्या माध्यमातून सर्वांनी साजरा करावा, यासाठी खुले निमंत्रण दिले होते. मात्र, काही मंडळींना हा आनंद देखवला नाही. हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी लोणीवाल्यांनी भरपूर प्रयत्न केला. भरपूर फोन लावले. दादागिरीही केली. मात्र, जनता पाठीशी असल्यावर घाबरण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

नाशिक-पुणे महामार्गावरील पथदिव्यांच्या लोकार्पणप्रसंगी आयोजित हॅपी हायवे कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या महामार्गाच्या आनंदोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याची अपेक्षा होती. महसूलमंत्री असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी महसूलशी संबंधित भूसंपादनाच्या कामामुळे खूपदा संबंध आला.

त्या प्रेमापोटी त्यांनी या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी निधी दिला. या आनंद सोहळ्यात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे ही अपेक्षा होती, मात्र त्यांनी कार्यक्रमच होऊ नये म्हणून अडथळे आणले. आता ही दादागिरी कोणी मान्य करणार नाही. या कार्यक्रमाचे कोणाला दुःख झाले असल्यास त्याला नाइलाज आहे.

‘एक तालुका, एक परिवार’ या संकल्पनेचे दर्शन घडवीत हजारो संगमनेरकरांनी रिमझिम पावसात या अविस्मरणीय सोहळ्याचा आनंद लुटला. सनई-चौघडे, ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी झाली.

दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी, बास्केटबॉल, स्केटिंग, पारंपरिक नृत्य, झुंबा, तायक्वांदो, फुगडी, वारकऱ्यांचे भजन, पारंपरिक पोशाखातील युवक-युवतींच्या उपस्थितीत भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांमधून हा सोहळा साजरा करण्यात आला. याला मालपाणी परिवाराच्या वतीने आयोजित आर्यन गाला बँड व इमॅजिका ऑर्केस्ट्राची सुरेल साथ मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com