शेतीविषयक धोरणावर टिका करणाऱ्यांना आताच का पुळका : राधाकृष्ण विखे पाटील

किरण नाईक
Sunday, 27 September 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे नविन शैक्षनिक धोरण अतिशय क्रांतीकारक आहे.

पुणतांबे (अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे नविन शैक्षनिक धोरण अतिशय क्रांतीकारक आहे. शिक्षण क्षेत्रातील बदलांची सुरुवात या धोरणामुळे निश्चीत होईल, असा विश्वास माजी मंत्री आमदार राधाक्रुष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. 

अत्यदोय चळवळीचे प्रणेते पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पुणतांबे ग्रामपंचायतीच्या वतिने ५० लाख रुपये खर्चाच्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गांचे भुमीपुजन, ऊर्दु अंगणवाडीचे उद्‌घाटन व दलीत वस्ती योजनेतुन चांगदेवनगर येथे पथदिव्याचा लोकार्पण सोहळा आमदार विखे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी सुकलेश्वर वहाडणे हे होते. सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी प्रास्ताविक करुन गावच्या विकास कामाची माहिती दिली.

उपसरपंच संगिता भोरकडे यांनी उपस्थीतांचे स्वागत केले. परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकरी उदवस्थ झाला आहे. कोरोना महामारी संकटात शेतकऱ्यांनी शेतीमाल बाहेर फेकला. याकडे तिन पक्षाच्या सरकारचे लक्ष नाही. परंतु केंद्र सरकारच्या शेतीविषय धोरणावर टिका करुन शेतकऱ्यांबाबतचा खोटा पुळका दाखवण्याचे काम राज्यातील सरकार करीत आहे. 

योग्य वेळी त्यांना धडा शिकवावा असे आमदार विखे यांनी सांगीतले. पाणी पुरवठा योजनेसाठी वाढीव निधीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगीतले. कार्यक्रमास सभापती नंदाताई तांबे. गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसीलदार रंधे, जिल्हा परिषद सदस्य शाम माळी, गणेश साखर कारखान्याचे संचालक विशाल चव्हाण, भागवत धनवटे आदी मान्यवर हजर होते. दत्ता धनवटे यांनी सुत्रसंचलन केले. तर विजय धनवटे. यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of the school at the hands of Radhakrishna Vikhe Patil at Puntambe