Girls Harassed at Relm: शनिवारी (ता.४) श्रीरामपूरहून दोन तरुण लोणी परिसरात आले. त्यांनी मुलींबद्दल टिंगल टवाळी करणारा अशोभनीय व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. काही तासांतच तो व्हायरल झाला आणि नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.
श्रीरामपूर: लोणी परिसरात मुलींची टिंगल टवाळी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या श्रीरामपूरच्या दोघांना लोणी पोलिसांनी अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणे या तरुणांना चांगलेच महागात पडले.