esakal | गर्भपात, अत्याचार गुन्ह्यातील कलमे वाढविली; तपासाची सूत्रे ढिकलेंकडे
sakal

बोलून बातमी शोधा

law-for-abortion-atrocities

गर्भपात, अत्याचार गुन्ह्यातील वाढविली कलमे

sakal_logo
By
संजय काटे

श्रीगोंदे (जि. नगर) : कर्जत तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फेब्रुवारीमध्ये पळवून नेले. अत्याचार करून नंतर तिचा गर्भपातही केला. या गुन्ह्याची फिर्याद घेताना व तपास करताना पोलिस अधिकाऱ्यांनी त्रुटी ठेवल्याने, आता हा तपास श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक रामराम ढिकले यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात महत्त्वाची व गंभीर कलमे वाढविण्यात आली आहेत. यातील दोषी असणाऱ्यांनाही अटक करण्यासाठी कुठलीही कसूर करणार नसल्याचे ढिकले यांनी सांगितले. (Increased-clauses-in-the-law-for-abortion-atrocities-nagar-crime-news)

तपासात गंभीर बाबी आल्या समोर

हे प्रकरण येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांच्यापुढे सुरू असताना काही गंभीर बाबी समोर आल्यानंतर, न्यायालयाने या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी येथील निरीक्षक ढिकले यांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तपास पुन्हा नव्याने सुरू झाला आहे.

या गुन्ह्यात साडेतेरा वर्षांच्या मुलीला सज्ञान दाखविताना खोटे आधार कार्ड बनविल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. शिरूर येथील होमिओपॅथी डॉक्टर संतोष चौरे यांना आरोपी केलेले नाही. शिवाय, न्यायालयात कर्जतचे उपनिरीक्षक अमरजित मोरे यांच्यावरही आरोप झाल्याने आता नव्याने तपास होत आहे.

हेही वाचा: नगरसेविकेच्या पतीच्या खिशातच मोबाईलचा स्फोट

तपासात कुठेही हयगय करणार नाही

‘‘या प्रकरणात काही महत्त्वाची कलमे फिर्यादीत दिसत नाहीत. बेकायदा गर्भपात करणे, खोटे दस्तऐवज तयार करणे, ही कलमे गुन्ह्यात नव्याने वाढविली आहेत. शिवाय, एमटीपी कायद्यान्वये काही कलमे वाढविता येतात का, याबद्दल कायदेशीर मार्गदर्शन घेत आहोत. यातील महत्त्वाचे आरोपी प्रत्यक्षात बाहेर दिसत आहेत. जे कोणी दोषी असतील, त्यांना अटकेची कारवाई होईल.’’ - रामराव ढिकले, पोलिस निरीक्षक, श्रीगोंदे

याप्रकरणी आता पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल. तपासात कुठेही हयगय करणार नसून, गर्भपात करणारा डॉक्टर व या गुन्ह्यातील इतर आरोपींना मदत करणाऱ्या सगळ्यांनाच आरोपी करणार आहोत. त्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील, अतिरिक्त अधीक्षक सौरव अग्रवाल व उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

(Increased-clauses-in-the-law-for-abortion-atrocities-nagar-crime-news)

हेही वाचा: मोदी, गडकरींच्या माध्यमातून रस्त्यांची कामे - डॉ. विखे पाटील

loading image