esakal | मोदी, गडकरींच्या माध्यमातून रस्त्यांची कामे - खासदार डॉ. विखे पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

MP Sujay Vikhe

मोदी, गडकरींच्या माध्यमातून रस्त्यांची कामे - डॉ. विखे पाटील

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कर्जत (जि. नगर) : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होत आहेत. आगामी काळात दळणवळणाच्या सुविधा निर्माण करून सर्वांगीण विकास साधला जाईल,’’ असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. (MP Sujay Vikhe said that road works are being done through Modi and Gadkari)

नगर-करमाळा राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन, कर्जत-नगर व आढळगाव ते जामखेड रस्त्याच्या कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, दादासाहेब सोनमाळी, सचिन पोटरे, प्रकाश शिंदे, काकासाहेब धांडे, बाबासाहेब गांगर्डे, सुनील यादव, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव आदी उपस्थित होते.

या वेळी भूसंपादन, कामाचा दर्जा, याबाबत नागरिकांनी आक्षेप घेत तक्रारी नोंदविल्या. नगर-सोलापूर मार्गावरील भूसंपादन नोटीस लवकरात लवकर काढणे व कर्जत- वालवड- घोगरगावमार्गे नगर रस्त्याच्या कामात दिरंगाईबद्दल संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याबाबत झालेल्या मागणीवर एकमत झाले. तसेच आढळगाव- जामखेड रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे आश्वासन डॉ. विखे पाटील यांनी दिले. दादासाहेब सोनमाळी यांच्यासह अनेकांनी प्रांताधिकारी नष्टे यांच्या कामकाजाबद्दल आक्षेप नोंदविला. त्यावर, ज्या अडचणी आहेत, त्या वगळता इतर नोटिसा बजावल्या असून, उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: पावसाने नगर महापालिकेच्या गटारस्वच्छतेचे पितळ उघडे

नगर-सोलापूर मार्गाचे काम लवकरच सुरू होईल. तत्पूर्वी आठ कोटी रुपये रस्त्याच्या डागडुजीसाठी मंजूर आहेत. खड्डे बुजविण्यास सुरवात झाली आहे.

- खासदार डॉ. सुजय विखे पाटील

(MP Sujay Vikhe said that road works are being done through Modi and Gadkari)

हेही वाचा: 'मी ईडीचा प्रवक्ता नाही', फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया

loading image