
Professors from Sanjeevani College celebrating their global recognition as top researchers in the USA.
Sakal
कोपरगाव: संजीवनी इंजिनिअरिंग काॅलेजच्या दोन संशोधक प्राध्यापकांनी अमेरिकेत आपल्या संशोधनाचा झेंडा फडकाविला. तेथील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने नुकतीच जगातील सर्वोच्च संशोधन असणा-या पहिल्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली. त्यात संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. ए. एस. सय्यद आणि संजीवनी युनिव्हर्सिटीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे डायरेक्टर डीन डॉ. पी. विल्यम यांचा समावेश आहे.