

“MLA Satyajeet Tambe raises Indiranagar issue in the Assembly; action ordered on sub-registrar.”
Sakal
संगमनेर : संगमनेरच्या इंदिरानगरमधील रहिवाशांच्या घरांच्या नोंदींचा अनेक वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेत प्रशासनाला जाब विचारताच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संगमनेरचे उपनिबंधक जाधव यांच्यावर तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. तांबेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे इंदिरानगरमधील सुमारे ७७२ नागरिकांच्या पोकळी हिस्सा नोंदीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी प्रशासनास तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.