esakal | राशीन ग्रामपंचायतीच्या कारभाराची होणार चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

An inquiry will be held into the affairs of Rashin Gram Panchayat

कर्जतचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांना याप्रश्‍नी तीन तास चांगलेच धारेवर धरीत त्यांची बोलती बंद केली.

राशीन ग्रामपंचायतीच्या कारभाराची होणार चौकशी

sakal_logo
By
दत्ता उकिरडे

राशीन : राशीन ग्रामपंचायतीने केलेली विविध विकासकामे, चौदावा वित्त आयोगाचा निधी, घंटागाडी निविदा प्रक्रिया आणि ई-निविदा, वसंतराव नाईक तांडा व दलितवस्ती योजनेच्या कामांमध्ये केलेल्या अफरातफरीप्रकरणी राजेभोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी आज आमरण उपोषण केले. 

कर्जतचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांना याप्रश्‍नी तीन तास चांगलेच धारेवर धरीत त्यांची बोलती बंद केली.

हेही वाचा - अजबच, या गावात होते दैत्याची पूजा

या प्रकरणाच्या सखोल चौकशीकामी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने जामखेडचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात येईल. त्यात गैरव्यवहार आढळून आल्यास आठ दिवसांत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन गटविकास अधिकारी जाधव यांनी दिल्यानंतर सायंकाळी हे उपोषण मागे घेतले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर करण्यात आलेल्या या उपोषणात युवक नेते शाहू राजेभोसले, विक्रम राजेभोसले, माजी सरपंच संदेश घोसे, राम कानगुडे, राम कानगुडे, अशोक जंजीरे, तात्यासाहेब माने, रामकिसन साळवे,ऍड. युवराज राजेभोसले, गणेश कदम, सुभाष जाधव यांच्यासह राजेभोसले गटाचे सुमारे पन्नास कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजना, दलितवस्ती योजनेची कामे, निकृष्ठ झाल्याचा आरोप करीत, घंटागाडी व ई-निविदा प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा जोरदार आरोप करीत सरपंचाच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत,कागदोपत्री पुरावे सादर करीत ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत तापकीर व अनिल भोईटे यांच्या कारभाराची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. 

संबंधितांना गटविकास अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आक्षेप घेत उपोषणकर्त्यांनी गटविकास अधिकारी यांना निरूत्तर केले.आजच्या उपोषणाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड हे आपल्या पथकासह राशीनमध्ये दिवसभर तळ ठोकून बसले होते. अहमदनगर
 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top