Ahilyanagar fraud:'अहिल्यानगरमध्ये शेअर मार्केटच्या नावे ५० लाखांची फसवणूक'; नफ्याचा आमिष नडला, दोघांविरुध्द गुन्हा

Big Scam in Ahilyanagar: २०२२ मध्ये एसएसवाय शिबिरादरम्यान फिर्यादी गिते यांची ओळख विशाल चव्हाण व त्याची पत्नी शितल ऊर्फ पूजा चव्हाण यांच्याशी झाली. त्यांनी व्हीसी इन्व्हेस्टमेंट या नावाने एसएमसी ग्लोबल शेअर ब्रोकर कंपनीमध्ये शेअर मार्केटमधून ३० ते ४० टक्के नफा मिळतो, असे सांगून गुंतवणुकीस प्रवृत्त केले.
Ahilyanagar: Fake share market scheme exposed; investor cheated of ₹50 lakh, police register case against two.
Ahilyanagar: Fake share market scheme exposed; investor cheated of ₹50 lakh, police register case against two.sakal
Updated on

अहिल्यानगर: शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून चौघांची ५० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात जिल्हा न्यायालयातील लघुलेखक अर्जुन लक्ष्मण गिते (वय ३६, रा. साई सोनल अपार्टमेंट, तपोवन रस्ता, अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २२) दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com