‘इंडिया बुक’मध्ये इरा भिलारेची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहमदनगर : ‘इंडिया बुक’ मध्ये इरा भिलारेची नोंद

अहमदनगर : ‘इंडिया बुक’ मध्ये इरा भिलारेची नोंद

अहमदनगर : अवघी दोन वर्ष नऊ महिन्यांची मुलगी, पण इंग्रजी व फ्रेंच भाषेमध्ये अंक सांगते. फ्रेंच भाषेमध्ये आठवड्याचे दिवस सांगते, फ्रेंच भाषेमध्ये प्रश्‍नांची उत्तरं देते. संस्कृत भाषेतील मंत्र तोंडपाठ बोलते. राष्ट्रगीत म्हणते. विविध योगासनं करते. फ्रेंच भाषेमध्ये कविता म्हणून दाखवते. खंडांची नावे सांगते. तिच्या या हुशारीमुळे तिच्या नावाची अल्पावधीतच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स आणि कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

लहानपणापासूनच इरा तल्लख बुद्धीची. कोणतीही गोष्ट चटकन लक्षात ठेवणारी. पालकांनाही या गोष्टीचा हुरूप वाटलं आणि त्यांनी इरा अधिकाधिक प्रमाणात कशी पारंगत होऊ शकते याकडे लक्ष दिले.

हेही वाचा: बारामतीचा अभिषेक ठरला देशातील पहिला युवा आयर्नमॅन....

इराची आई आरती भिलारे व वडील रोहन भिलारे यांनी तिचा सराव करून घेतला. स्पर्धेची माहिती घेतली व नोंदणी केली. ता. ७ ऑक्‍टोबर रोजी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि ता.२७ ऑक्‍टोबर रोजी कलाम वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये तिची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले व प्रमाणपत्रासाठी नामांकन मिळाले.

इरा काय काय सांगते ?

इंग्रजी व फ्रेंच भाषेमध्ये अंक, इंग्रजी व फ्रेंच भाषेमध्ये आठवड्यातील दिवस, इंग्रजी व फ्रेंच भाषेमध्ये स्वतःबद्दल प्रश्‍न -उत्तरं, इंग्रजी व फ्रेंच भाषेमध्ये कविता, विविध संस्कृत मंत्र, राष्ट्रगीत, खंडांची नावे तोंडपाठ सांगते व योगसनं करून दाखवते.

loading image
go to top