

Godavari Region Farmers in Distress; Hope Rests on Timely Rainfall
sakal
शिर्डी: मागील पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे आणि जायकवाडी धरण देखील भरले, तरीही यंदा गोदावरी कालव्यांच्या नशिबी पुन्हा झाडाझडतीने भोग आले. पाऊस लांबल्याने गोदावरी कालव्यातून सोडलेले शेतीचे आवर्तन तातडीने बंद झाले. राहाता, कोपरगाव, सिन्नर आणि वैजापूर तालुक्यातील काही भागातील सुमारे दहा लाख टन उसाचे भवितव्य धोक्यात आले. आता या बारमाही पिकांना केवळ पाऊसच वाचवू शकेल. त्यानेच दडी मारल्याने शेतकरी हबकून गेले. नियोजनाअभावी ऊस आणि फळबाग शेतीचे तीनतेरा वाजण्याची वेळ आली.