esakal | वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली; राहुरीत आरोपींची अटकपूर्व वैद्यकीय चाचणी होईना
sakal

बोलून बातमी शोधा

It is necessary to conduct pre arrest medical examination of the accused in Rahuri

आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय चाचणीबरोबर कोरोना तपासणी करण्याचा वरिष्ठांचा आदेश राहुरीत वारंवार धाब्यावर बसविला जात आहे.

वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली; राहुरीत आरोपींची अटकपूर्व वैद्यकीय चाचणी होईना

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय चाचणीबरोबर कोरोना तपासणी करण्याचा वरिष्ठांचा आदेश राहुरीत वारंवार धाब्यावर बसविला जात आहे.  इतर कैद्यांबरोबर राहुरी कारागृहात एक रात्र काढलेला एक कैदी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याला तातडीने नगर येथे जिल्हा कारागृहाच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले.

मागील महिनाभरात अशाच प्रकारामुळे आतापर्यंत ३७ कैदी व १२ पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित झाले. तरी, त्याच चुकांची पुनरावृत्ती घडत असल्याने पोलिस वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : नगरच्या पवार बंधुचा ‘कार’नामा; जुन्या टू व्हीलरपासून बनवली फोर व्हीलर
चिंचोली फाटा येथे एका हॉटेलमध्ये घातक शस्त्राने एका तरुणाला गंभीर मारहाणप्रकरणी चार दिवसांपूर्वी राहुरी पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली. त्यांची कोरोना तपासणी करण्यापूर्वी, त्यांना कारागृहातील बरॅकमध्ये ढकलण्यात आले.  त्यांनी बरॅकमधील इतर कैद्यांबरोबर २८ सप्टेंबरची रात्र काढली. २९ सप्टेंबरला त्यांची कोरोना चाचणी झाली. त्यात, एक आरोपी पॉझिटिव्ह आढळला.  त्यामुळे, राहुरी पोलिस ठाण्यात पुन्हा धावपळ उडाली. कोरोनाबाधित आरोपीला रुग्णवाहिकेतून नगर येथे जिल्हा कारागृहाच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मागील महिन्यात देसवंडी येथे मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केली होती. त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल येण्यापूर्वी त्यांना कारागृहात डांबण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यातील एक कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर आठ दिवसात कैदी आजारी पडण्यास सुरुवात झाली. तब्बल ३७ कैदी, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह बारा पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या घटनेच्या महिनाभरात पुन्हा पुनरावृत्ती घडली. राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या कोरोना विषयी बेफिकीरी बद्दल 'सकाळ' ने यापूर्वीही वाचा फोडली.  परंतु, त्यांच्या हटवादी स्वभावामुळे राहुरी कारागृहातील कैदी व सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव वारंवार धोक्यात येत आहे. त्यामुळे, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top