नगरच्या पवार बंधुचा ‘कार’नामा; जुन्या टू व्हीलरपासून बनवली फोर व्हीलर

विनायक दरंदले 
Friday, 2 October 2020

निंभारी (ता. नेवासे) येथील पवार बंधुनी लॉकडाऊनमध्ये घरबसल्या उद्योग म्हणून जुन्या दुचाकी मोटारसायकलपासून चारचाकी मोटार तयार केली आहे. त्यांचा हा कारनामा परीसरात चर्चेत आला आहे.

सोनई (अहमदनगर) : निंभारी (ता. नेवासे) येथील पवार बंधुनी लॉकडाऊनमध्ये घरबसल्या उद्योग म्हणून जुन्या दुचाकी मोटारसायकलपासून चारचाकी मोटार तयार केली आहे. त्यांचा हा कारनामा परीसरात चर्चेत आला आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
निंभारी येथील स्थापत्य अभियंता शिक्षण झालेल्या मात्र सध्या शेती करत असलेल्या जनार्दन पवार यांच्या मॅकेनिकल इंजिनियरचा डिप्लोमा करत असलेल्या युवराज, दहावी शिकत असलेला प्रताप व त्यांचा सातवी शिकलेल्या चैतन्य मकासरे यांनी लॉकडाऊनचा मोकळा वेळ सार्थकी लावत जुन्या दुचाकी मोटारसायकल पासून चारचाकी मोटार तयार केली आहे.

धुळ खात पडलेली दिडशे सीसीची पल्सर मोटारसायकलपासून चारचाकी मोटारची निर्मिती करण्यापुर्वी युवराज तिची डिझाईन बनविली. गबाळात पडलेले लोंखड व पत्रे घेवून पवार बंधुनी दोन महिन्यात पाच व्यक्तीकरीताची मोटार तयार केली आहे. बाजारातून गेअरबॉक्स आणून ही मोटार मागे घेण्याची सोय केली आहे. तासी सत्तर किलोमीटर वेग
या मोटारीस आहे.

हेही वाचा : काँग्रेसकडून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
युवराजने यापुर्वी टाकाऊ वस्तूपासून लॉन कटिंग यंत्र, हरबरा पेरणी यंत्र, कपाशी पीकात अंतर मशागतीचे कोळपणी यंत्र तसेच लाकडाच्या विविध खेळणी तयार केलेल्या आहेत. वडील जनार्दन तसेच परीवारातील संजय, हरिभाऊ, पांडुरंग पवार व गोकुळ औटी यांची विशेष साथ लाभली, असे प्रताप पवार यांनी सांगितले.

मॅकेनिकलची डिग्री घेवून सर्वसामान्यांना परवडेल अशी चारचाकी मोटारसायकल निर्मितीचा माझा प्रयत्न असणार आहे. जिद्द आणि ध्येय असेल तर अवघड काहीच नाही.
- युवराज पवार, निंभारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of students made four wheels from a motorcycle