esakal | भाजपच्या कायम निमंत्रित सदस्यपदी जाजू, पिचड, विखे पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Jaju, Pichad, Vikhe Patil as permanent invited members of BJP

आज प्रदेश कार्यलयाकडून जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिका-यांची अंतिम यादी नक्की करण्यात आली.

भाजपच्या कायम निमंत्रित सदस्यपदी जाजू, पिचड, विखे पाटील

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीत कायम निमंत्रित सदस्यपदी शाम जाजू, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अॅड.रविकाका बोरावके, माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे, आमदार वैभव पिचड, सिताराम गायकर, हेरंब औटी, उदयसिंह चंदेल,विठ्ठलराव लंघे, राजेश चौधरी व राहात्याच्या नगराध्यक्ष ममता पिपाडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली.

ते म्हणाले, आज प्रदेश कार्यलयाकडून जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिका-यांची अंतिम यादी नक्की करण्यात आली. पक्षाच्या नूतन जिल्हा कार्यकारीणीतील सदस्य पुढील प्रमाणे, शरद थोरात(कोपरगाव), अॅड.रघुनाथ बोठे (राहाता), अशोक पवार (शिर्डी), नितीन कापसे (राहाता), सुधाकर गुंजाळ (संगमनेर), गणेश राठी  (संगमनेर), सतीश सौदागर (श्रीरामपूर), सचिन देसरडा (नेवासा), सुदाम सानप (संगमनेर) या सर्वांची उपाध्यक्षपदी तर नितीन दिनकर (नेवासे), जालिंदर वाकचौरे (अकोले), सुनिल वाणी (श्रीरामपूर) यांची सरचिटणीपदी नियुक्ती करण्यात आली.

महिला, युवा, अनुसुचित जाती, अदिवासी, अल्पसंख्यांक, किसान व इतर मागासवर्गीय मोर्चाच्या अध्यक्षपदी अनुक्रमे, सोनाली नाईकवाडे (संगमनेर), श्रीराज डेरे (संगमनेर), विनोद राक्षे (कोपरगाव), विजय भांगरे (अकोले), असिफखान पठाण (संगमनेर), सतीश कानवडे (संगमनेर), बाळासाहेब गाडेकर(राहाता) यांची नियुक्ती करण्यात आली. 

दत्तात्रय काले( कोपरगाव शहर अध्यक्ष), अॅड.श्रीराम गणपूले( संगमनेर शहर अध्यक्ष), ज्ञानेश्वर गोंदकर (राहाता तालुका अध्यक्ष), सचिन शिंदे (शिर्डी शहर अध्यक्ष), मारूती बिंगले (श्रीरामपुर शहर अध्यक्ष), बबन मुठे(श्रीरामपूर तालुका अध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली.

राजेंद्र गोंदकर (उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष ) - जिल्हा कार्यकारीणी सदस्य व नव्या पदाधिका-यांची निवड करताना समतोल साधण्यात आला. पक्षाचे काम करण्यासाठी वेळ देऊ शकणा-या कार्यकर्त्यांना संधी मिळाली. नव्या जुन्यांचा मेळ साधण्यात आला आहे. पक्षाचा संघटनात्मक विस्तार करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.