

Crores Spent, Yet No Clean Drinking Water: Ahilyanagar MPs Target Administration
sakal
अहिल्यानगर: केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेसह विविध पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीत प्रशासन आणि ठेकेदाराने गांभीर्य दाखवले नाही. सरकारने पाण्यासारखा पैसा खर्च केला. मात्र, पैशाचा विनियोग अंमलबजावणी करणाऱ्यांनी केला नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामीण भागात जनतेला शुद्ध पाणी मिळत नाही, ही बाब दुर्दैवी असल्याची खंत खासदार भाऊसाहेब वाकचौरे व नीलेश लंके यांनी व्यक्त केली.