जामखेड : रत्नागिरी रेल्वे मार्गावर सोने चोरीतील मुख्य मास्टरमाइंड आरोपी जामखेडचा निघाला आहे. या आरोपीला मोठ्या शिताफीने पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपीकडून ४२ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले..MPSC Success Story : साताऱ्यातील कामगाराचा मुलगा बनला 'क्लास वन' अधिकारी; वैभवने हलाखीच्या परिस्थितीवर मात करत गाठले यशाचे शिखर !.मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या नेरूळ युनिट पाचने रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या रेल्वे चोरीच्या साखळीला मोठा धक्का दिला. जामखेड येथील मुख्य आरोपी विनोद सखाराम जाधव (वय ३२) याला शिताफीने पकडून त्याच्याकडून ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने (मूल्य पाच लाख दोन हजार रुपये) आणि इतर मालमत्ता हस्तगत केली. या कारवाईत एकूण आठ रेल्वे चोरीचे गुन्हे उघडकीस आले..स्थापन झालेल्या रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापे वामने ते दिवाण खवटी रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे मेल गाड्यांमधून सोन्याचे दागिने आणि पर्स चोरीचे प्रमाण वाढले होते. प्रवाशांच्या तक्रारींनी पोलिसांना सतर्क केले. पोलिस उपनिरीक्षक लोणकर आणि त्यांच्या पथकाला या चोरींची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक विजय खेडकर यांनी तत्काळ तीन विशेष पथके रवाना केली..पथकाने जामखेड येथून मुख्य आरोपी विनोद सखाराम जाधवला शिताफीने पकडले. तपासादरम्यान त्याचे साथीदार मारुती राजेंद्र झरे, सोनू सुरेश काळे आणि लाला मच्छिंद्र पवार यांचा सहभाग उघड झाला. आरोपींच्या कबुलीत त्यांनी एकूण आठ चोरीचे गुन्हे केले होते..थरारक घटना! 'कादवे डोंगरातील कड्यात परप्रांतीय युवक रात्रभर जाेरजाेरत ओरडला, आवाज कुणीच ऐकला नाही, सकाळ झाली अन्... आरोपींची चोरीची पद्धत अत्यंत वेगळी होती. ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा धोका टाळण्यासाठी कारने रेल्वे स्टेशनपर्यंत येत. गाडी दूर उभी करून झाडांमध्ये लपायचे. सोनू काळे हा रेल्वे ॲपवरून मेल गाड्यांची माहिती घेत अंधारात उघड्या खिडक्यांतून हात घालून सोन्याचे दागिने आणि पर्स चोरायचा. विनोद जाधव पोलिस कस्टडीत असताना संपूर्ण गुन्हा कबूल केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.