भाजपचे राळेभात रोहित पवारांसोबत, जाहीरपणे केली घोषणा

Jamkhed market committee director sudhir ralebhat said we are with MLA Rohit Pawar for the benefit of farmers and development work
Jamkhed market committee director sudhir ralebhat said we are with MLA Rohit Pawar for the benefit of farmers and development work

अहमदनगर : आम्ही विखे गटाचे कार्यकर्ते असून, त्याच गटाबरोबर कायम राहणार आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी व विकासकामांसाठी आमदार रोहित पवार यांच्याबरोबर आहोत, अशी माहिती जामखेड बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
जिल्हा बॅंकेसाठी विकास सेवा संस्था मतदारसंघातून संचालक जगन्नाथ राळेभात यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो भोसले यांनी सोमवारी मागे घेतला. पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, संचालक जगन्नाथ राळेभात, अमोल राळेभात आदी उपस्थित होते.

हे ही वाचा : 'हिरकणी'वर 'लाल परी'च भारी; निमआराम गाड्यांकडे पाठ फिरवत प्रवाशांची पसंती
 
राळेभात म्हणाले, जामखेडमधील विकासासाठी, तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार रोहित पवार यांच्याबरोबर राहणार आहे. पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्‍यात विकासकामे सुरू असल्यामुळेच त्यांच्याबरोबर राहणार आहोत. आम्ही विखे गटाचे असून, यापुढेही विखे गटातच राहणार आहोत, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
भोसले म्हणाले, आमदार रोहित पवार यांच्याकडून तालुक्‍यात विकासकामे सुरू आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार मी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. हा निर्णय आमदार रोहित पवार, जगन्नाथ राळेभात, सुधीर राळेभात आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

दरम्यान, भोसले यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता दोनच अर्ज शिल्लक राहिले असून, त्यातील एक जगन्नाथ राळेभात यांचा व एक अर्ज त्यांचा मुलगा अमोल राळेभात यांचा आहे. अमोल राळेभात यांचा अर्ज खासदार डॉ. सुजय विखे यांच्याशी चर्चा करून मागे घेण्यात येईल, असे यावेळी सुधीर राळेभात यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com