कोरोनाची साखळी तुटली अन अधिकाऱ्यांमुळे प्रेमाची कडी जोडली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

नगर जिल्ह्यातील जामखेड तालुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत राहिला. जामखेड शहरात तब्बल 17 कोरूना बाधित रुग्ण सापडले.

जामखेड ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहर राज्याच्या नकाशावर चर्चेत आले. येथे निघालेल्या सतरा कोरोनाबाधित रुग्णांमुळे तब्बल महिनाभराहून अधिक काळ जामखेड 'हाँटस्पाँट' राहिले. मात्र, कालच येथील हाँटस्पॉट हटविण्यात आले. कोरानाची साखळी तोडण्यात प्रशासन यशस्वी झाले. यामध्ये अरोग्य विभाग, महसूल विभाग, नगरपालिका व पोलिस प्रशासनाने पार पाडलेले 'कर्तव्य'  कौतुकास्पद ठरले. त्यात पोलिसांची कामगिरी लक्षवेधी ठरली. बंदोबस्तच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाने दिवस-रात्र एक करुन ही जबाबदारी चोख सांभाळली. परिणामी जामखेडकरांची आणि त्या अधिकाऱ्यांची प्रेमाची कडी जोडली गेली.

पोलिस उपअधिक्षक संजय सातव यांनी घेतली आणि थेट बंदोबस्तासाठी बनविलेल्या 'खर्डा चौकात' जावून पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक निरिक्षक चव्हाण व नीलेश कांबळे या तिन्ही अधिकाऱ्यांचा 'गौरव' केला. विशेष म्हणजे ते त्यांना क्वॉरंटाइन व्हावे लागले होते.

हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरे यांची नगरमध्ये गुंतवणूक

नगर जिल्ह्यातील जामखेड तालुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत राहिला. जामखेड शहरात तब्बल 17 कोरूना बाधित रुग्ण सापडले. गेली महिनाभरापासून शहर 'हॉटस्पॉट' राहिले.  कोरोनाची साखळी तुटावी याकरिता 'प्रशासनाने' सतर्क होऊन प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंबर कसली. दिवस-रात्र एक करून जामखेडकरांना घराबाहेर पडू  दिले नाही.

या काळात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच सेवा दिली. जामखेड शहरातील नगर रस्ता, बीड रस्ता, खर्डा रस्ता आणि खर्डा चौक अशा चार ठिकाणी पोलिसांच्या चौक्या रस्त्यावर उभारल्या. शहराअंतर्गत येणारे अन्य रस्ते 'सील' केले.

रात्र-दिवस काम

पोलीस बांधवांना शिक्षक,ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांनी चेकपोस्ट वर कर्तव्य बजावले.  दिवस-रात्र या चौक्यांच्या ठिकाणी आळीपाळीने पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नीलेश कांबळे हे अधिकारी स्वतः गस्त घालीत होते. पोलिसांनी सर्व रस्ते बंद केल्यामुळे शहरातून होणारी सर्व वाहतूक गेली महिनाभरापासून पूर्णतः बंद होती. अत्यावश्यक गरज असेल तरच तुरळक व्यक्ती कामानिमित्त काही वेळासाठी रस्त्यावर दिसले अन्यथा संपूर्ण शहर बंद राहिले . 

अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून पोलीस उपनिरीक्षक संजय सातव  यांनी या तिघां अधिकार्यांच्या पाठीवर छबासकीची थाप अनोख्या पध्दतीने दिली. जामखेडच्या खर्डा चौकात येऊन गुलाबपुष्पांचा गुच्छ देऊन गौरव केला. वरिष्ठांकडून झालेल्या या सन्मानामुळे या अधिकार्यांचा ऊर भरुन आला.

एपीआय आणि पीआय आले होते बाधिताच्या संपर्कात
पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नीलेश कांबळे हे दोघे जामखेडला पहिल्यांदा सापडलेल्या दोघां कोरोना बाधितांच्या संपर्कात आले होते. म्हणून चौदा दिवस ते सेल्फ क्वॉरंटाइन झाले होते. त्यांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले. मात्र, दोघेही चौदा दिवस कोरंटाईन राहिले होते. त्यानंतर दोघेही आपल्या कर्तव्यावर हजर झाले. निर्भिडपणे हाँटस्पाँटमध्ये नागरिकांना सूचना करणे, बंदोबस्ताचे नियंत्रण करण्याचे काम त्यांनी केले.स्वतःच्या जीवाची परवा न करता सेवा करणाऱ्या या अधिकार्यांना जामखेडकरांचा सलाम केला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Jamkhed senior officers felicitated junior officers