
“Villagers of Malevadi and Dighol in Jamkhed taluka await relief as poor connectivity leaves them isolated.”
esakal
-बाळासाहेब शिंदे
खर्डा: जामखेड तालुक्यातील शेवटचे टोक म्हणजे माळेवाडी गाव. या गावाचा दिघोळ ग्रुप ग्रामपंचायतमध्ये समावेश होतो. गावची लोकसंख्या साडे आठशेच्या आसपास आहे. या गावात जाण्याच्या मार्गावर मांजरा नदी प्रवाह जातो. या पुलाची उंची कमी असल्याने जास्त प्रमाणात पाऊस झाला की, माळेवाडी व दिघोळ गावाचा संपर्क तुटतो. अनेक सोयी-सुविधांपासून गाव वंचित आहे.