
सांगता समारंभाला आमटी व भाकरीचा महाप्रसाद वाटप केला जातो. या सोहळ्याला 60 ते 70 हजार भाविक समाधीस्थळी लिन होतात. मात्र, चालू वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व देवस्थान परिसरात गर्दी न करण्याचे शासनाचे निर्देश आहेत
कोपरगाव - येथील बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज पुण्यतिथी व अनुष्ठान सोहळा चालू वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.
केवळ पाच भक्त प्रतिनिधी स्वरूपात अनुष्ठानला बसणार आहे. गेल्या पंचवीस वर्षाच्या परंपरेची जपवणूक ट्रस्टच्या वतीने करणार आहे, अशी माहिती राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी स्थान व काशी विश्वेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ह. भ. प. मोहनराव चव्हाण यांनी दिली.
हेही वाचा - रोहित पवार यांचे पोलिसांना अनोखे गिफ्ट
दरवर्षी समाधी स्थळ येथे पुण्यतिथी सोहळा व जपानुष्ठान सोहळा आयोजित करण्यात येतो. सात दिवस चालणाऱ्या जपानुष्ठानाला दरवर्षी एक हजारपेक्षा जास्त भाविक बसतात. राज्यातील विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या भक्तांसाठी जनार्दन स्वामींच्या शिष्य परंपरेतील संत महंत यांचे कीर्तन, प्रवचन व भजन संध्या आदी कार्यक्रमातून भाविकांना सांसारिक व आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते.
सांगता समारंभाला आमटी व भाकरीचा महाप्रसाद वाटप केला जातो. या सोहळ्याला 60 ते 70 हजार भाविक समाधीस्थळी लिन होतात. मात्र, चालू वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व देवस्थान परिसरात गर्दी न करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यतिथी सोहळ्यास दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ट्रस्टच्या वतीने ठराविक भाविकांना अनुष्ठानला बसवणार आहेत.
गेल्या पंचवीस वर्षांची परंपरा जपणूक करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. सामाजिक अंतर व शासकीय नियमांचे पालन करून दर्शन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.