Shivam Lohakare Won The Silver Medal : नगरच्या शिवम लोहकरेला रौप्यपदक; सिद्धार्थ चौधरीला गोळाफेकीत सुवर्ण

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गणेशवाडी, सोनई गावच्या १९ वर्षीय शिवमने पहिल्याच प्रयत्नात ७२.३४ मीटर अंतरावर भाला फेकला.
Shivam Lohakare won the silver medal
Shivam Lohakare won the silver medalsakal

Shivam Lohakare Won The Silver Medal - दक्षिण कोरियातील येचॉन येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंनी भारताला एक रौप्य व एक ब्राँझपदक मिळवून दिले. त्यात नगर जिल्ह्यातील असलेल्या शिवम लोहकरेने भालाफेकीत रौप्य जिंकले; तर ब्राँझपदक जिंकणाऱ्या भारतीय संघात सातारच्या अनुष्का कुंभारचा समावेश होता.

Shivam Lohakare won the silver medal
Pune : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बारामतीत आणण्यासाठी पवारांकडे आग्रह

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गणेशवाडी, सोनई गावच्या १९ वर्षीय शिवमने पहिल्याच प्रयत्नात ७२.३४ मीटर अंतरावर भाला फेकला. सुवर्णपदकासाठी त्याची लढत तायपईच्या चाओ हुंगसोबत होती. चाओने ७२.८५ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक निश्चित केले; तर शिवमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. २०१६ च्या स्पर्धेत नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले होते.

Shivam Lohakare won the silver medal
Mumbai : मुंबईकरांसाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त पाणीसाठा; पाणीपट्टी दरवाढीवरून भाजप आक्रमक

त्यानंतर भालाफेकीत पदक जिंकणारा शिवम भारताचा पहिलाच खेळाडू होय. सुरुवातीला प्रशांत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भालाफेकीचे धडे गिरवल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून तो पुण्यात माजी आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू काशिनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

शिवमने यंदा तिरुवनमलाई येथे झालेल्या ज्युनिअर फेडरेशन करंडक स्पर्धेत ७३.८२ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्ण जिंकले होते. भारताला आज सिद्धार्थ चौधरीने गोळाफेकीत सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात १९.५२ मीटर अंतरावर गोळा फेकला व सुवर्ण जिंकले. दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सहा पदके जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com