अहमदनगर : घनकचऱ्यासाठी जेसीबी ;संग्राम जगताप

आमदार जगताप; महापालिकेत नवे दोन यंत्र दाखल
JCB for solid waste; Sangram Jagtap
JCB for solid waste; Sangram Jagtapsakal

अहमदनगर : शहरात वेगाने कामे सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापन व नागरिकांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने दोन जेसीबी घेण्यात आले. या यंत्रांची साथ काम उरकण्यासाठी होईल, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

JCB for solid waste; Sangram Jagtap
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

नगर शहरातील घनकचरा व्यवस्थापन व नागरिकांची इतर प्रश्न सोडविण्यासाठी विलंब होत होता. आता महापालिकेने स्वतःच्या मालकीचे दोन जेसीबी घेतले आहेत. जेसीबीची चावी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, स्थायी समितीची सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, तसेच मान्यवर उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, की या माध्यमातून शहरातील प्रश्न वेगाने सोडवण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारचे भारत स्वच्छ अभियान राज्य सरकारचे माझी वसुंधरा अभियान व महानगरपालिकेचे नगर शहर स्वच्छ अभियान सुरू आहे. या अभियानासाठी जेसीबीचा खऱ्या अर्थाने उपयोग होऊन रस्त्याच्या कडेची माती उचलण्यास मदत होणार आहे. याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाचे विविध प्रश्न वेगाने मार्गी लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com