
मनापासून आनंद देणाऱ्या कर्मयोगाच्या भावनेतून संगमनेर महाविद्यालयात पत्रकारितेचा अभ्यासक्रम चालविला जात असल्याचे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
संगमनेर (अहमदनगर) : मनापासून आनंद देणाऱ्या कर्मयोगाच्या भावनेतून संगमनेर महाविद्यालयात पत्रकारितेचा अभ्यासक्रम चालविला जात असल्याचे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
संगमनेर महाविद्यालयातील पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाच्या 2019 - 2020 या शैक्षणिक वर्षातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ते म्हणाले, मराठी मातृभाषा असल्याने ती स्वतंत्रपणे शिकण्याची अनेकांना गरज वाटत नाही. परंतु पत्रकारिता करताना भाषेचा जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागतो. त्यासाठी प्रमाण भाषा येणे गरजेचे असते. वृत्तपत्रविद्या पदविका पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये भाषेच्या विविध पैलूंचा बारकाईने अभ्यास करून घेतला जातो. पत्रकारांनी प्रामाणिकपणे काम करून समाजाला योग्य दिशा द्यायला हवी. आपण बोलतो त्याचप्रमाणे लिहिणे आपल्याला जमले पाहिजे.
भविष्यामध्ये अनेक चांगले पत्रकार संगमनेर महाविद्यालयातून घडावेत अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या हस्ते डॉ. अनुश्री खैरे (88.28 ) प्रथम, सुविधा सालपे (88) द्वितीय तर जिजाबा हासे (87.42 ) तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रा. पोपट सातपुते, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, मधुसूदन नावंदर, किसनभाऊ हासे, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रा. डॉ. संतोष खेडलेकर, अभ्यासक्रम समन्वयक प्रा. सुशांत सातपुते आदी उपस्थित होते.
संपादन : अशोक मुरुमकर