अहमदनगर : लिपिकास कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

four years imprisonment

अहमदनगर : लिपिकास कारावास

संगमनेर - आठ वर्षांपूर्वी तत्कालीन नायब तहसीलदार व कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. याप्रकरणी संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरु होता. आज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी कनिष्ठ लिपिकास चार वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. नायब तहसीलदारास सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कनोली येथील उत्तम पर्बतराव वर्पे यांनी 2014 साली प्रवरानदी पात्रातून वाळू उचलण्याचा परवाना मिळविला होता. मात्र 13 जून 2014 रोजी कनिष्ठ लिपिक सुभाष विठ्ठल भारती याने कनोलीजवळ वर्पे यांचे दोन ट्रॅक्टर पकडले. पंचनामा करुन संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. वर्पे यांनी वाळू वाहतुकीच्या पावत्या घेऊन नायब तहसीलदार शीतल सावळे यांची भेट घेतली. त्यांनी कायदेशिर कारवाई पूर्ण झाल्याचे सांगत कारवाई न करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर वर्पे यांनी अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. 8 जुलै 2014 रोजी लाचलुचपतच्या पथकाने कनिष्ठ लिपिक भारती यास लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्यासह नायब तहसीलदार सावळे यांच्यावर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचे दोषारोपपत्र संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावरील सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व सरकारी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाने सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरुन न्या. घुमरे यांनी आरोपी भारती याला तीन वर्षे सक्तमजूरीची शिक्षा व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, तसेच कलम 13 (2) नुसार चार वर्षे सक्त मजुरी व 4 हजारांचा दंड, दंड न भरल्यास 4 महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. सावळे यांना सबळ पुराव्याअभावी सोडण्यात आले. खटल्याचे कामकाज सरकारी अभियोक्ता बी. जी. कोल्हे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार सुनील सरोदे, कैलास कुऱ्हाड, प्रवीण डावरे, चंद्रकांत तोर्वेकर, दीपाली दवंगे व स्वाती नाईकवाडी यांनी सहकार्य केले.

Web Title: Junior Clerk Sentenced To Four Years Imprisonment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top