
अहिल्यानगर: अन्सार रहीम शेख (वय ४०) याच्यावर कोयते, लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या खुनी हल्ल्यात आतापर्यंत १० आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील ६ आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. शेख यांचे लोकेशनची माहिती देणाऱ्या गावातील दोघांना सहआरोपी करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील चार आरोपी अद्याप फरार आहेत.