Video : वही-पेन घेऊन शाळेत जायचं ते कोयता घेऊन जातात उसाच्या फडात

Karan-Arjun from Siddhatek are working in a sugarcane field.jpg
Karan-Arjun from Siddhatek are working in a sugarcane field.jpg

सिद्धटेक (अहमदनगर) : 'कष्टाशिवाय फळ नाही', या वडीलांनी दिलेल्या कानमंत्राचाच आधार घेत काबाडकष्ट करीत असलेल्या 'करण-अर्जुन' या भावंडांना, शिक्षणाने परिस्थितीवर सहज मात करता येऊ शकते, हे विचार कदाचित शिवलेच नसावेत. त्यामुळेच ऊसतोडणी कामगार असलेल्या आई-वडिलांना मदत म्हणून कुटुंबाच्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीवर कोयत्याने सपासप 'वार' करीत ते पुढे चालले आहेत. पुढे काय होणार? याची जराही चिंता या दोघांना नसली, तरी या अवस्थेत त्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची व आर्थिक पाठींब्याचीसुद्धा !

ऊसतोडणी कामगारांसाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथील गुंडाळे कुटुंब शिकलेही बेताचेच. म्हणजे रावसाहेब हे नववी उत्तीर्ण आणि मालनताई या दुसरी पास. त्यामुळे मोलमजुरी करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय या कुटुंबाकडे नाही. थोडीफार शेती, परंतु पाण्याअभावी तीही पडीकच. त्यामुळे ऊस तोडणी हाच मुख्य व्यवसाय झाल्यामुळे हे कुटुंब सध्या अंबालिका कारखाना कार्यक्षेत्रात राहत आहे. दोन मुले व दोन मुली असा परिवार आणि जेमतेम आर्थिक परिस्थितीत त्यांची गुजराण सुरू आहे. यामध्ये वडील रावसाहेबांप्रमाणेच कुटुंबाची जबाबदारी आहे. 

करण-अर्जुन या अनुक्रमे दहावी व दुसरीतील भावंडांवरच त्यामुळे दररोज पहाटे पाच वाजता सुरू झालेला त्यांचा दिनक्रम रात्री अकरा ते बारा वाजता संपतो. यावेळेत ऊस तोडण्यापासून वाढ्याचे भेळे बांधणे, त्याची विक्री करणे, ऊसाच्या मोळ्या ट्रेलरमध्ये भरणे इथपर्यंतची कामे केली जातात. त्यातील बहुतांशी कामात करण व अर्जुन पूर्ण ताकदीनिशी कुटुंबाला मदत करतात. ज्या वयात त्यांनी मनसोक्त खेळायचे, बागडायचे, त्याच वयात केवढी ही जबाबदारी ? चार पैसे गाठीला येतात म्हणून पालकांकडूनही या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा असंख्य 'करण-अर्जुन'चे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी अशा मुलांसह त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व योग्यप्रकारे पटवून देण्याची गरज आहे.

'उबंटू फाउंडेशन' उचलतेय खारीचा वाटा

ऊसतोडणी कामगार, वीटभट्टी मजूर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना बालमजुरीपासून रोखून पुन्हा शिक्षणाकडे वळवण्यासाठी 'उबंटू फौंडेशन'ने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. करण-अर्जुन व त्यांच्या सारख्या शेकडो मुलांना आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच पुढील नियोजनासाठी वेगवेगळ्या स्वरूपात हे फाउंडेशन मदत करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com