
येथे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने बारामती एग्रीकल्चर ट्रष्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते शासकीय कार्यालयांना रंगरंगोटी करण्यासाठी मोफत रंग देण्यात आला.
कर्जत (अहमदनगर) : शहर स्वच्छतेसाठी राजकीय रंग बाजूला ठेवीत स्वच्छ मनाने एकत्र येऊ या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून ग्राम स्वच्छता ही लोकचळवळ यशस्वी होईल, यासाठी कर्जतकरानो योगदान द्या. आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत, असे प्रतिपादन एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रष्ट बारामतीच्या विश्वस्त श्रीमती सुनंदा पवार यांनी केले.
हे ही वाचा : मुळा कारखान्याला साखर आयुक्तांची भेट, आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन
येथे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने बारामती एग्रीकल्चर ट्रष्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते शासकीय कार्यालयांना रंगरंगोटी करण्यासाठी मोफत रंग देण्यात आला. याबाबत नगरपंचायतच्या वतीने मागणी करण्यात आली होती. त्या मागणीची दखल घेत पूर्तता करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेविका मनीषा सोंनमाळी, माजी जिल्हाध्यक्षा माधुरी लोंढे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, मुख्याधिकारी गोविंद जाधव, बांधकाम विभागाचे उप अभियंता अमित निमकर, भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी, पत्रकार संघटना, आजी माजी सैनिक संघटना, हरित अभियान, शिक्षक संघटना, आर्ट ऑफ लिव्हिंग, संभाजी ब्रिगेड, राजमुद्रा ग्रुप, स्नेहप्रेम, डॉक्टर्स संघटना, मुंजाबा मित्र मंडळ आणि मेडिकल संघटना आदी उपस्थित होते. या वेळी शहरात श्रमदान करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांचा श्रीमती पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर्स संघटनेच्या वतीने स्वच्छता अभियानासाठी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली.
हे ही वाचा : कोरोना काळात रूग्णांकडून उकळलेली वाढीव बिले रद्द करा, मनसे आक्रमक
सुनंदा पवार म्हणाल्या, शहर स्वच्छतेसाठी गेली ८३ दिवस शहरातील विविध संघटना श्रमदान करीत आहेत. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. तसेच तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर राज्यात हा एकमेव आदर्श असेल. प्रत्येक कार्यालय स्वच्छ ठेवणे ही त्या कार्यालय प्रमुखांची जबाबदारी आहे. यावेळी चंद्रशेखर यादव, अनिल तोरडमल, नितीन देशमुख, गणेश जेवरे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी मानले.
कर्जत जामखेड मतदार संघ हे कुटुंब असून त्यातील सर्व नागरिक सदस्य आहेत. मतदारसंघात राजकारण विरहित सर्वांगीण विकास साधला जाईल.
- रोहित पवार,आमदार- कर्जत जामखेड
संपादन - सुस्मिता वडतिले