Lok Sabha Poll : कर्जत-जामखेडमध्ये नवमतदार निर्णायक ठरणार; वाढलेली मतदार संख्या कुणाच्या पथ्यावर पडणार?

लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात रंग भरले जात आहेत. कर्जत-जामखेडमध्ये नव मतदार निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
Lok Sabha Poll
Lok Sabha Poll Sakal

कर्जत : लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात रंग भरले जात आहेत. कर्जत-जामखेडमध्ये नव मतदार निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही वाढलेली संख्या कुणाच्या पथ्यावर पडते हे आगामी काळच ठरवेल. या १८ ते २२ वयोगटातील मतदार आकर्षित करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत.

नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके आणि भाजपसह महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात लढत होत आहे. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून डावपेच आखले जात मतदारापर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

युवा वर्ग आकर्षित होण्यासाठी समाज माध्यमांवरील विविध प्रकारच्या पर्यायांचा मोठ्या खुबीने वापर केला जात आहे.

यामध्ये प्रथमच मतदान करणाऱ्या, तसेच उशीर नोंद केलेल्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, या निवडणुकीत कर्जत, जामखेडमध्ये नव मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार यात शंका नाही.

नव मतदारांमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते आ. रोहित पवार आणि भाजपचे विधान परिषदेचे आ. राम शिंदे या दोन्ही नेत्यांचे फॉलोवर समाज माध्यमावर जास्त असून, त्यात युवकांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे या दोघांचे एकमेकांवर समर्थक टीका टिप्पणी करीत एकमेकांवर तुटून पडत आहेत.

आकडे बोलतात...

  • कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार - ३३६९०२

  • पुरुष मतदार - १७७३३५

  • महिला मतदार -१५९५६७

  • १८ ते १९ वर्ष- ४७००

  • २० ते २९ वर्ष- ६५४५१

  • ३० ते ३९ वर्ष --७०६७१

  • मतदान केंद्र ३५६

२०१९ लोकसभा निवडणुकीत पडलेली मते....

  • डॉ. सुजय विखे पाटील - १०५२३६

  • संग्राम जगताप - ८०५६३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com