
शिंदे म्हणाले, ""या प्रभागात नीता कचरे यांचे काम अत्यंत चांगले असून, आगामी काळात सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू.''
कर्जत : कर्जत नगरपंचायतीचा बिगूल वाजला आहे. आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांचे समर्थक प्रराचालाही लागले आहेत. दोन्ही गटांतून निवडणुकीची जुळवाजुळव सुरू आहे.
""राजकारणात हार-जित असतेच. पदापेक्षा सर्वसामान्यांना मी महत्त्व देतो. कर्जत नगरपंचायतीत भाजपची सत्ता येणार आहे. ही मोठी उपस्थिती पाहून या प्रभागातून विद्यमान नगरसेविका नीता कचरे यांना पुन्हा एकदा संधी देतो; आपण विजयावर शिक्कामोर्तब करा,'' असे आवाहन माजी मंत्री राम शिंदे यांनी केले.
तालुक्यातील जोगेश्वरवाडी येथील सभामंडप लोकार्पण सोहळा व अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख सचिन पोटरे, नगरसेविका उषा राऊत आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ""या प्रभागात नीता कचरे यांचे काम अत्यंत चांगले असून, आगामी काळात सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू.''
हेही वाचा - मोबाईल अॅपने केला घात, तीन पुणेकर बुडाले
नामदेव राऊत म्हणाले, ""नगरपंचायतीच्या माध्यमातून कर्जत शहराचा स्वप्नवत विकास साधला आहे. अत्यंत जटिल अशा पिण्याच्या पाणीप्रश्नासह अनेक समस्या माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सोडविल्या आहेत. साधलेला सर्वांगीण विकास लोकांसमोर असून, त्याच शिदोरीवर नगरपंचायतीत पुन्हा भाजपची सत्ता येईल, याचा विश्वास आहे.''
नीता कचरे म्हणाल्या, ""कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका गृहिणीला नगरसेवक होण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग प्रभागाच्या विकासासाठी केला आणि सर्वांच्या सहकार्यातून दोन क्रमांकाचा प्रभाग आदर्शवत बनविला आहे.''
या वेळी प्रतिभा भैलुमे, सचिन पोटरे, काका धांडे, वृषाली पाटील, हर्षदा काळदाते, उषा राऊत, राणी गदादे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन दादा शिंदे यांनी केले.
संपादन - अशोक निंबाळकर