ऑपरेशन मुस्कानअंतर्गत नगर जिल्ह्यात कर्जत उपविभाग प्रथम

निलेश दिवटे
Monday, 4 January 2021

पोलिस उपविभागात ऑपरेशन मुस्कानअंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी केल्याने कर्जत उपविभागाचे पोलिस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर येथे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला आहे.

कर्जत (अहमदनगर) : पोलिस उपविभागात ऑपरेशन मुस्कानअंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी केल्याने कर्जत उपविभागाचे पोलिस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर येथे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला आहे.

नगर पोलिस दलाच्या वतीने अपहरण व हरवलेल्या बालक, महिला, मुली आणि पुरुष यांचा शोध होण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. या मोहिमेत डिसेंबर2020अंतर्गत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे आदेश प्राप्त होताच कर्जत उपविभागातील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलिस ठाण्यात या अनुषंगाने पथके नेमण्यात येऊन उपविभागात 20अपहरणाचे गुन्हे दाखल होते. त्यापैकी 10अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यास पथकाला यश आले. 

महिला हरवलेल्या 171प्रकरणे प्रलंबित होती त्यापैकी 84महिलांचा शोध घेण्यात पथकाला यश आले. असून हरवलेले पुरुषांचे 162 प्रकरणे दाखल होती. त्यापैकी मुस्कान ऑपरेशन अंतर्गत 75जणांचा शोध घेण्यात आला. या मोहिमेत उपविभागातील 169अपहरित व हरवलेल्या महिला, पुरुष, बालकांचा शोध घेण्यात पोलिस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलिस ठाण्यात स्थापन केलेल्या पथकास यश आले. 

या कामगिरीत नगर जिल्यात कर्जत उपविभागाचा प्रथम क्रमांक आल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी येथील पोलिस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव व त्यांच्या पथकातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ऑपरेशन मुस्कानमध्ये उपविभागाचे पथकाचे समनव्यक म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे पोलिस नाईक भरत गडकर यांनी काम पाहिले.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव, श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विठ्ठल पाटील, जामखेडचे पोलिस सब इन्स्पेक्टर सज्जनसिह नर्हेडा, बेलवंडीचे पोलिस सब इन्स्पेक्टर प्रकाश बोराडे, कर्जतचे पोलिस सब इन्स्पेक्टर भगवान शिरसाठ, पोलिस नाईक भारत गडकर, पोलिस नाईक वाबळे, पोलिस किरण बोराडे, वैभव खिळे, बाजीराव सानप, गोरख गायकवाड, महिला पोलिस अविंदा जाधव, गीतांजली लाड यांनी परिश्रम घेतले.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे मोहीम यशस्वी!
हरवलेले महिला मुली, महिला, बालके पुरुष यांच्या नातेवाईक आणि संबंधित व्यक्ती शोधून त्यांचे मोबाईल नंबर शोधून त्यांचा लोकेशन घेऊन त्यांचा शोध घेण्यात पोलिस पथकाला यश आले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karjat subdivision first in Nagar district under Operation Muskan