Ahmednagar Crime News : युवकाच्या खूनप्रकरणी दोघे अटकेत; एक फरार

युवकाचा खून करून तो जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात पुरून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी नितीन नर्गिशा काळे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
karjat youth killing case two arrested one abscond crime police
karjat youth killing case two arrested one abscond crime police Sakal

कर्जत : येथील युवकाचा खून करून तो जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात पुरून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी नितीन नर्गिशा काळे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक जण फरार आहे.

तुषार शिवा काळे व गौरी तुषार काळे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने सोमवार (ता.२२) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांनी दिली आहे. फरार तिसऱ्या आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली आहेत.

याबाबत नितीन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी तुषार काळे, अश्विनी काळे व गौरी काळे (सर्व रा. राजीव गांधी नगर, कर्जत) यांनी ता. १८ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भाऊ महेश यांचे अपहरण केले. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तुषार काळे यास अटक केली.

खुनाची कबुली

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने आपण महेश नर्गिशा काळे यास मारहाण करून त्याचा खून केला, तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात पुरला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला जामखेड तालुक्यातील जवळा येथे आणले असता पोलिस निरीक्षक मारुती मुळूक, जामखेडचे तहसीलदार गणेश माळी आणि पंचांसमक्ष मृतदेह उकरून दाखविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com