
जामखेड: तालुक्यातील सर्वात मोठा खैरी मध्यम प्रकल्प शुक्रवारी (ता.२९) पूर्ण क्षमतेने भरला असून, ओव्हर फ्लो झाला आहे. ५३३.६० दशलक्ष घनफूट क्षमता असलेला खैरी मध्यम प्रकल्प जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून, शुक्रवारी दुपारी तीन वाजून ११ मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरून खैरी प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदीपात्रात नऊ क्यूसेक इतका विसर्ग सुरू झाला आहे.