महालक्ष्मीहिवरे येथील खंडोबाची यात्रा रद्द; उत्सवातील वर्गणीतून सीसीटीव्ही बसविणार

विनायक दरंदले
Sunday, 13 December 2020

महालक्ष्मीहिवरे (ता. नेवासे) येथे चंपाषष्ठीनिमित्त होणारा सात दिवसीय यात्रा सोहळा कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून रद्द करण्यात आला आहे.

सोनई (अहमदनगर) : महालक्ष्मीहिवरे (ता. नेवासे) येथे चंपाषष्ठीनिमित्त होणारा सात दिवसीय यात्रा सोहळा कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून रद्द करण्यात आला आहे. जमा होणाऱ्या लोकवर्गणीतून मंदीर व परिसरात सीसीटीव्ही सुविधा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

महालक्ष्मीहिवरे येथील पुरातन खंडोबाचे मंदीर प्रसिद्ध असुन येथे दरवर्षी चंपाषष्ठीनिमित्त सात दिवस मोठी यात्रा भरते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बाहेरगावी असलेले सर्व ग्रामस्थ सोहळ्यासाठी गावी येतात. यंदा कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात आज झालेल्या बैठकीत यात्रा कमेटी, पालखी मंडळ,ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने देव ओवाळणी,पालखी व कावड मिरवणूक, अभिषेक,जागरणगोंधळ,करमणूक कार्यक्रम व कुस्त्याचा हगामा रद्द केला आहे.

कोरोना संसर्गाची काळजी म्हणून यात्रा महोत्सव रद्द केला आहे.मुख्य दिवशी मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुरणपोळी व रोडग्याचा प्रसाद ठेवून पुजा केली जाणार आहे, असे माजी सरपंच राजेंद्र पालवे यांनी सांगितले. 

ग्रामस्थांनी परिस्थितीची जाणीव ठेवून प्रशासनास केलेले सहकार्य स्तुत्य आहे.खर्चाला फाटा देवून हाती घेतलेला सीसीटीव्ही चा उपक्रम गावाच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण आहे.
- ज्ञानेश्वर थोरात, सहायक पोलिस निरीक्षक 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khandoba Yatra at Mahalakshmihivare cancel