
Maharashtra police rescue minor girl safely; kidnapper arrested and taken into custody.
Sakal
राहुरी: तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन (वय १६) मुलीचे अपहरणप्रकरणी गुन्ह्यातील एका आरोपीला राहुरी पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका करून, तिला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याने अपहरणाच्या गुन्ह्यात पोक्सो कायद्यांतर्गत कलम वाढविण्यात आले आहे.