Ahilyanagar Crime: 'अपहरण करणारी टोळी जेरबंद'; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, कोथरूड येथून आरोपी अटक..
Kidnapping Gang Busted: कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत असून गुन्हे शाखेच्या दक्षतेचे कौतुक केले जात आहे. पुढील तपासात टोळीचा नेटवर्क, इतर सहकारी आणि मागील गुन्ह्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अहिल्यानगर: अपहरण करून खंडणी गोळा करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. कोथरूड (पुणे) येथून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.