
बसस्थानक परिसरात थांबलेल्या ट्रकचालकाला गतीमंद व्यक्तीने बाटली फेकून मारली. मात्र, बाटली चुकवत ट्रकचालक तेथून निघून गेला. याबाबत माहिती मिळताच सहायक फौजदार लबडे यांनी लोणीहून पोलिस व्हॅन बोलविली. व्हॅन पाहताच त्या व्यक्तीने हातात दगड घेतले.
कोल्हार (अहमदनगर) : गतीमंद व्यक्तीच्या हल्ल्यात सहायक फौजदार व दोघे गावकरी जखमी झाले. फुटकी बाटली व काठीने त्याने तिघांवर वार केले. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास बसस्थानक परिसरात हा प्रकार झाला. पोलिस दूरक्षेत्राचे सहायक फौजदार बाबासाहेब लबडे, संपत आप्पासाहेब राऊत व घुम्या बोरुडे, अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी गतीमंद व्यक्तीस ताब्यात घेतले.
अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बसस्थानक परिसरात थांबलेल्या ट्रकचालकाला गतीमंद व्यक्तीने बाटली फेकून मारली. मात्र, बाटली चुकवत ट्रकचालक तेथून निघून गेला. याबाबत माहिती मिळताच सहायक फौजदार लबडे यांनी लोणीहून पोलिस व्हॅन बोलविली. व्हॅन पाहताच त्या व्यक्तीने हातात दगड घेतले. त्यामुळे व्हॅन दूर ठेवून इतर पोलिसांसह लबडे त्याच्याजवळ गेले. यावेळी त्यांची गतीमंद व्यक्तीसोबत झटापटही झाली. त्यातच हाती आलेल्या काठीने त्याने लबडे यांच्यावर हल्ला केला. तेथून मार्केट यार्डकडे संपत राऊत जात होते. यावेळी तो जोरजोरात शिवीगाळ करीत होता. तो गतीमंद असल्याचे माहित नसल्याने राऊत यांनी त्याला हटकले असता, त्यांच्यात झटपट सुरू झाली. त्यात त्याने फुटक्या बाटलीने राऊत यांच्यावर वार केला. घुम्या बोरुडे यांनाही मारहाण केली.
हे ही वाचा : मुद्रित माध्यमांवरील विश्वास कायम : संजय कळमकर
कोल्हारमधील दोन-तीन गतीमंद लोकांच्या त्रासाला गावकरी वैतागले आहेत. आठवडे भाजीबाजारात अश्लील हावभाव करीत जोरजोरात शिवीगाळ करणे, फुटकी बाटली वा काठी घेऊन रस्त्याने ये-जा करणारे, या पद्धतीने दुकानदारांना त्रास दिला जात आहे. दरम्यान, अशा लोकांवर कारवाई करण्याबाबत माजी सरपंच ऍड. सुरेंद्र खर्डे यांनी तहसीलदार कुंदन हिरे यांचे लक्ष वेधले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
घरच्यांचा जबाब घेऊन तो गतीमंद आहे का, याची शहानिशा करू. त्यासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेण्यात येईल. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- समाधान पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, लोणी पोलिस ठाणे