

Kolhar Incident Raises Alarm as Freshly Constructed Drainage Slab Collapses
Sakal
कोल्हार: जलजीवन मिशनअंतर्गत येथील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी टाकण्यात आलेल्या ‘पीव्हीसी’ जलवाहिनीचे रस्त्याच्या खोदईमध्ये तुकडे झाल्याची घटना ताजी असताना या रस्त्याच्या साईड गटाराच्या नवीन कामाचा स्लॅब गुरुवारी (ता. ४) दुपारी ढासळला. जलवाहिनी तुटल्याच्या ठिकाणच्या खोदाईचे काम चार दिवसांपासून बंद आहे. चार दिवसांपूर्वी भरलेला स्लॅब ढासळला.