
कोपरगाव: तालुक्यातील डाऊच बुद्रुक येथे आठ ऑगस्ट रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस तपासात महिलेच्या पतीनेच कौटुंबिक वादातून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, आरोपीस मदत करणारा त्याचा साथीदार मेहुणा फरार आहे.