

Women voters to decide Kopargaon’s civic poll fate — 1,500 new voters strengthen the female voter base.
Sakal
-मनोज जोशी
कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली. विधानसभेला राज्यात महायुती शासनाला लाडक्या बहिणींनी मताधिक्य मिळवून देत सत्तेच्या चाव्या दिल्या. आता पालिका निवडणुकीत पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने महिला मतदार पुन्हा राजकीय आखाड्यात गेमचेंजर ठरणार आहेत. नवमतदारांचे सुमारे दीड हजार मतदान वाढल्याचे आकडेवारीवरून तरी सध्या दिसत आहे. त्यामुळे महिला नेमके कोणाला झुकते माप देणार ? हे पाहावे लागेल. सर्वच पक्ष, स्थानिक आघाड्यांना महिला मतदारांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.