शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई करण्यात आली. संवत्सर शिवारात पोलिसांनी छापा घातला असता, मंदाबाई बळीराम आहेर या महिलेकडे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे ४० हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन, २५ लिटर गावठी दारू मिळून आली.
Kopargaon police in action: Accused with warrants arrested, illegal liquor setups demolished during combing operation.Sakal
कोपरगाव: शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत संवत्सर शिवारात नारंदा नदीच्या काटवनात सुरू असलेल्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून कच्चे रसायन नष्ट केले, तसेच कोम्बिंग ऑपरेशन राबवून विविध गुन्ह्यांतील एक व वाॅरंटमधील तब्बल आठ आरोपींना अटक केली.