esakal | कोपरगावात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच रात्रीत पाच दुकाने फोडल्याने नागरिकांमध्ये दहशत !
sakal

बोलून बातमी शोधा

In Kopargaon several shops along the Yeola Road area have been repeatedly vandalized for the past six months

या अजब चोरीच्या गजब कहानीने नागरिकांमध्ये मात्र दहशत निर्माण झाली आहे. 

कोपरगावात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच रात्रीत पाच दुकाने फोडल्याने नागरिकांमध्ये दहशत !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव (अहमदनगर) : मागील सहा महिन्यांपासून येवला रस्ता परिसरातील अनेक दुकाने वारंवार फोडली जात आहेत. चोरही दुकानांतील कुठलीही वस्तू न चोरता केवळ रोकड चोरत आहेत. मंगळवारीही (ता. 2) चोराने पाच दुकाने फोडून 52 हजार 500 रुपयांची रोकड लांबविली. या अजब चोरीच्या गजब कहानीने नागरिकांमध्ये मात्र दहशत निर्माण झाली आहे. 

साडेआठ एकरांत पेरूतून कमावले ४० लाख, दैठणे गुंजाळच्या शेतकऱ्याची दुष्काळासोबत टक्कर

याबाबत अधिक माहिती अशी की येवला रस्त्यावरील मनोज जोशी यांच्या साडी दुकानाच्या छताचा पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. उचकापाचक करून गल्ल्यातील 20 हजार रुपयांची रोकड व एक चांदीचे नाणे असा ऐवज लांबविला. समर्थ इलेक्‍ट्रॉनिक दुकान फोडून तेथूनही 20 हजार रुपये लंपास केले. शेजारील चंद्रहास पैठणी दुकानाचे छत कापून 10 हजार 500 रुपये चोरले. विजय प्रकाश पाखरे यांचे दुचाकी व साईकमल फर्निचर हे शो-रूम फोडून सामानाची उचकापाचक केली. मात्र, तेथे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.

नगर शहर होणार पंचतारांकीत, महापालिकेची फुल्ल तयारी
 
चोराचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यापूर्वीही दुचाकी शो-रूम व विजय ट्रेडर्स हे किराणा मालाचे दुकान सलग तीन वेळा फोडून रोकड लंपास केली. त्या परिसरातील गॅरेज, टपऱ्या फोडणे चोरासाठी हातचा मळ झाला आहे. प्रत्येक दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा चोरटा दिसत असूनही त्याच्यापर्यंत पोलिस अद्यापही पोचू शकले नाहीत.

loading image